असोसिएशन चे उद्देश
-
कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशनच्या कार्यक्षेत्रातील नागरी सहकारी
बँकेच्या व्यवस्थापनाचा दर्जा सुधारावा, त्यांचा कार्यात एकसूत्रता यावी, त्यांचे काम
अधिकाधिक परिणामकारक व लोकाभिमुख आणि व्यावसायिक व्यवस्थापनास
अनुलक्षूण व्हावे म्हणून त्यांना मार्गदर्शन करने, सल्ला देणे आणि विविध स्तरावर त्यांचे
प्रश्न सोडवून या बँकेच्या प्रवक्ता म्हणून काम करणे. महाराष्ट्र शासन, आर. बी. आय व
बँकदरम्यान निर्माण होणारे प्रश्न सोडविण्याकरिता प्रयत्न करणे.
-
सभासद बँकेच्या व्यवसायाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी व प्रश्नांचे बाबतीत रिझर्व्ह
बँक, महाराष्ट्र शासन, सहकारी खाते व अन्य संबंधित संस्थांकडे सभासद बँकेच्या
प्रातिनिधित्व करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणे.
-
पुनर्वसनात असलेल्या बँकांना सल्ला देणे, मार्गदर्शन करणे व त्यांना त्यातून बाहेर
येणेस मदत करणे.
-
सभासद बँकेच्या सभासदांना, संचालकांना व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे अगर
याबाबत योग्य ती सोय उपलब्ध करून देणे.
-
सभासद बँकेच्या व इतर सहकारी संस्थांचे थकबाकी वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था
अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली सहकार खात्याचा अधिकारी प्रतिनियुक्तीवर
घेऊन बँकेच्या व इतर सहकारी संस्थांचे थकबाकीदार विरुद्ध वसुली दाखले देणेची
कार्यवाही करणे त्यासाठी स्वतंत्र वसुलीकक्ष चालविणे.
-
सभासद बँकांना त्यांचा गरजेनुसार भेटी देऊन मार्गदर्शन करणे. रिझर्व्ह बँक
सहकार खाते, महाराष्ट्र राज्य नागरी बॅंक्स फेडेरेशन व राज्य सहकारी बॅंक्स असोसिएशन
यांचेकडून आलेले आदेश व सूचना या संबंधी सभासद बँकांना आवश्यकतेनुसार माहिती पुरविणे.
-
आर्थिक बाजार व नवीन योजना अगर अस्तित्वात असलेल्या कर्जसंबंधीच्या
निरनिराळ्या योजनांची माहिती व त्यासाठी मिळणाऱ्या सवलतीच्या फायदा सभासद
बँकेना देणेचे प्रयत्न करणे.
-
सभासद बँकांकडून वार्षिक हिशोबाची पत्रके, अहवाल व सांख्यकीय माहिती मागवून
एकत्रित करणे व प्रसिद्ध करणे.
-
बँकिंग व्यवहाराला पोषक असे अद्यावत ग्रंथालय सुरु करणे यासाठी आवश्यक ती
पुस्तके खरेदी करणे.
-
नागरी सहकारी बँकिंगच्या विधायक कार्याचा प्रचार व प्रसार विविध माध्यमातून करणे.
जरूर तर स्वतःचे वृत्तपत्र/पाक्षिक/मासिक याद्वारे प्रबोधन करणे.
-
सभासद बँका व त्यांचे नोकर यांचे संबंध चांगले राहावेत म्हणून प्रयत्न करणे.
-
बी.आय.आर. ऍक्ट १९४६ खाली सभासद बँकेच्या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती,
औद्योगिक कलह किंवा सभासदांना लागू असणारे विविध कामगार कायद्याखाली
येणारे वादात सभासद बँकांचे करिता व वतीने कामगार व युनियन यांना मागणी देणे व
बदलाची नोटीस देणे, सभासद बँकाकरिता व त्यांचे वतीने कर्मचारी किंवा युनियनशी
वाटाघाटी करणे, मागण्यांबाबत तडजोड करणे आणि करारावर सह्या करणे उच्च न्यायालय,
सर्वोच्च न्यायालय, कामगार कायद्याखाली स्थापन झालेल्या न्यायालयात खटला/दावा दाखल करणे.
विविध न्यायालयातील सभासद बँकांशी संबंधित खटले/दावेचे कामी सभासद बँकांचे वतीने व
करिता त्यांचे मागणी प्रमाणे वकिलांची नियुक्ती करणे व त्यासाठी होणारा खर्च संबंधित बँकाकडून
वसूल करणे.
-
असोसिएशनच्या हिताच्या व उपयुक्ततेच्या द्रुष्टीने आवश्यक वास्तू भाड्याने घेणे, संपादन
करणे, खरेदी घेणे, जागा घेऊन बांधणे, तिची देखभाल करणे अथवा तिचे रूपांतर/बदल करने.
-
असोसिएशनच्या कार्यासाठी लागणारे निधी व वर्गणी गोळा करणे व त्याचा असोसिएशनचे उद्देश
पूर्ततेसाठी विनियोग करणे.
-
सदस्य बँकांना सामूहिक, तांत्रिक व अन्य सेवा उपलब्ध करून देणे व त्यासाठी आवश्यकतेप्रमाणे शुल्क
आकारणे.
-
सदस्य बँका तसेच इतर वित्तिय संस्थांसाठी बिझनेस फ़ॅसिलेटर व बिझनेस
करसस्पॉन्डन्ट म्हणून काम करणे त्याचप्रमाणे क्रेडिट इन्फरमेशन ह्यूमन रिसोर्स व इतर क्षेत्रात
सदर बँका व संस्थांना सेवा उपलब्ध करून देणे, त्यासाठी आवश्यकते प्रमाणे शुल्क आकारणे.
-
नागरी सहकारी बँकेच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी बँकांतील वरच्या श्रेणीतील अधिकाऱ्याचे राखीव
पॅनल तयार करणे व बँकाच्या मागणीनुसार त्यांना ते उपलब्ध करून देणे.
-
सभासद बँकांसाठी "आदेश कर्ज नियमावली" ,"आदर्श सेवक नियम"; बँकिंग व्यवहारात लागणारे
आदर्श (मॉडेल) फॉर्मंस बनवणे इ.
- सदस्य बँकांसाठी व इतर वित्तिय संस्थांसाठी म्युच्युअल अरेंजमेंट स्किम्स ए.टी.एम., डाटा सेंटर, सॉफ्टवेअर सर्विसेस व तत्सम, इतर सामूहिक, तांत्रिक व अन्य सेवा उपलब्ध करून देणे त्यासाठी आवश्यक ते शुल्क आकारणे.